Languages:

  • English
This site is created using Wikimapia data. Wikimapia is an open-content collaborative map project contributed by volunteers around the world. It contains information about 32478090 places and counting. Learn more about Wikimapia and cityguides.

Narayangaon

Narayangaon, Dist - Pune
Narayangaon is one of the important towns in Junnar Taluka (Pune District), popular for its natural beauty. Water is abundant because of its close proximity to major dams, the western ghats, and the Sahyadri mountain range.

आता नारायणगड जवळ आहे म्हणुन "नारायणगाव" असा माझा समज आहे, पण त्याहिपेक्षा "गणपीर" डोंगर जास्त जवळ असताना "नारायणगड"च का? हे मला अजुनही न सुटलेल कोड आहे.
.गावाला वेढा देवुन जाणारी मीना नदि म्हण्जे "घाण" वाहुन नेण्यासाठि व लोकांनी "घाण" करण्यासाठि आहे ह्याचा प्रत्यय नदिच्या कडेने हिंडल्यानंतरच येतो. प्रत्येक गावाला गावकुशीचा रस्ता असतो ज्याला सुशिक्षित "बायपास" व गावकरी "गोखाडिचा रस्ता" म्हणतात तो नारांगावात नेमका कुठे आहे ह्याचा मात्र गोंधळ आहे.पुणे-नासिक हायवेवर असण्याचा बिनचुक फायदा उचलत हया गावाने तालुक्याच्या गावावरहि मात केलि. अगदि कानामागुन येवुन तिखट झालयाप्रमाणे, (तशी इथली मिसळहि तिखटच असते बरका) पण.. . वर्षानुवर्षे अगदि रंगरुपानं काडीमात्रहि न बदलले इथलं एस.टि स्टॅडं म्हण्जे मात्र करमणुकिचाच विषय. त्यातल्या "शेवंता थिएटर्स" च्या बोर्डवर कुठलंया पिक्चरचं (कि हिरोईनच) पोस्टर लागलय ह्यावर पोरांची विषेश नजर. शेजारच्या लिंबाच्या जुनाट झाडांखाली लक्ष्मीनारायण, अलंकार क्लाथ सेंटर किंवा प्रकाशचे माक्याचे तेल असले कसले तरी बोर्ड हमखास लागलेले असतातच, त्यांच्या खालि सावलिपाहुन बसायला जावं तर वर टपुनच बसलेल्या कावळ्यानं त्याचा प्रसाद दिलाच. . . सगळं काही जसंच्या तस्सच!! . . . ह्या सगळ्यांची त्यांच्यात्यांच्यातच विचित्र "मॅच्युअल डिपेंडंसी" असावी (नव्हे तर आहेच) अशी माझी खात्रीच आहे. उन्हाळ्यातिल खास आकर्षण म्हण्जे तमाशाच्या राव्हट्या. . . मंगला, रघुवीर(लोक याला रघ्या म्हण्त्यात), पांडुरंग मुळे, भिका-भिमा,तांबे, महाडिक,ढवळपुरिकर, आररर र नुसत्या ४०-५० एका चढ एक बाऱ्या. ह्या रघ्याच्या तमाशात अमुक अमुक नाचनारि आहे ना ती गेल्या वर्षि नित्या बनसोडेच्या फडात "मुंगळा-मुंगळा" या गाण्यावर धिंगाना करायचि. इतपर्यंत इंत्यंभुत माहिति असणारेही अनेक नगहि नारांगावातच सापडतिल. फडासाठि, लोककलेसाठि उभं आयुष्य कष्ट उपसणाऱ्या "विठाबाई भाउ मांग" हिला "नारायणंगावकर" असं उपपद अदरानं बहाल करणारि तमाशापंढरीहि हिच.

Recent city comments:

  • Guruvayya Rajaram Parashuram Sabnis Vidyamandir (GRPS), Akshay (guest) wrote 7 years ago:
    Pic ahe ka school cha
  • Guruvayya Rajaram Parashuram Sabnis Vidyamandir (GRPS), AKANKSHA (guest) wrote 10 years ago:
    I MISS MY SCHOOL DAYS......................
  • Guruvayya Rajaram Parashuram Sabnis Vidyamandir (GRPS), Bhagyashri Dhananjay Dhumal (guest) wrote 11 years ago:
    I love me school very much.Also I miss my school days.
  • SAHAJEEVAN - DURAPHE TAKALKAR FAMILY, SHAMKANT (guest) wrote 12 years ago:
    MAJHE GHAR
  • Pathak Classes, Narayangaon., Raju (guest) wrote 12 years ago:
    The best teacher of mathematics form GRPS Vidyamandir. I also learned many things from them.
more comments...
Narayangaon on the map.

Recent city photos:

more photos...